बांगलादेशात अबू सिद्दिकी याने हिंदु प्रेयसीचे केले ३ तुकडे

अबू बकर सिद्दिकी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील खुलना येथील अबू बकर सिद्दिकी नावाच्या मुसलमानाने त्याची हिंदु प्रेयसी कविता राणी हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३ तुकडे केले. त्यानंतर आरोपीने तिचे डोके आणि दोन्ही हात कापले अन् ते प्लास्टिकमध्ये गुंडाळून नाल्यात फेकले, अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने दिली.