श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील शोपिया जिल्ह्यात असलेल्या कापरेन भागात ११ नोव्हेंबर या दिवशी सुरक्षा दल आणि जिहादी आतंकवादी यांच्यात उडालेल्या चकमकीत जैश-ए-महंमदचा एक आतंकवादी ठार झाला. ‘कमरान भाई उपाख्य हनीस असे याचे नाव आहे. कमरान हा कुलगाम आणि शोपिया या भागांत कार्यरत होता. पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम चालू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ट्वीटद्वारे दिली. या परिसरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती आहे.
जम्मू-कश्मीर के शोपियां के कापरेन इलाके में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़ जारी है. इस ऑपरेशन में सुरक्षा बलों ने एक आतंकवादी को मार गिराया. #JammuKashmir #Shopian #Terrorists https://t.co/sj8w2GKBch
— ABP News (@ABPNews) November 11, 2022
याआधी १० नोव्हेंबर या दिवशी जम्मू-काश्मीर पोलिसांनी भारतीय सैन्यासमवेत संयुक्त कारवाई केली. या वेळी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आतंकवाद्यांच्या निधी आणि भरती करणार्या गटाच्या ६ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांचा पाठीराखा असलेल्या पाकलाच नष्ट करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |