अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवप्रेमींकडून साखर वाटप ! 

शिवतीर्थ येथे सरकारच्‍या निर्णयाचे अभिनंदन करतांना श्री. नितीन शिंदे आणि शिवप्रेमी

सांगली – अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवभक्‍तांकडून साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीसमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली. या वेळी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, श्री शिवप्रतिष्‍ठान युवा हिंदुस्‍थानचे श्री. नितीन चौगुले, शिवसेनेचे श्री. प्रसाद रिसवडे आणि श्री. नितीन काळे, मावळा प्रतिष्‍ठानचे श्री. ऋषिकेश पाटील, भाजप प्रदेश सचिव श्री. पृथ्‍वीराज पवार, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांसह अन्‍य उपस्‍थित होते.