‘आम्ही फार फार प्राचीन आहोत. आमचे अनंत जन्म झाले आहेत. अनेक जन्मी ही ज्ञानवचने आम्ही ऐकत आलो आहोत. अनेक जन्म ममत्वाच्या गर्तेत फिरलो आहोत आणि तरीही आम्ही तसेच कोरडे आहोत. अजूनही निजलोच आहोत. अजूनही आमचे डोळे उघडत नाहीत. अनेक वेळा पहाट झाली आहे. अनेक वेळा सूर्य उगवला आहे; पण आम्ही मात्र अंधारात आहोत. मायेच्या अंधाराला पकडून आहोत.’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०१८)