ट्विटर खात्यासाठी द्यावे लागू शकतात पैसे !

‘टि्वटर’चे नवीन मालक इलॉन मस्क

नवी देहली – ‘टि्वटर’चे नवीन मालक इलॉन मस्क टि्वटरचा वापर करणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. मस्क यांनी अलीकडेच काही देशांमध्ये ‘ब्लू टीक’साठी पैसे आकारण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.

मस्क यांनी एका बैठकीत टि्वटरचे खाते असणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या कल्पनेवर कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या योजनेमुळे वापरकर्त्याला मर्यादित वेळ विनामूल्य प्रवेश मिळेल. यानंतर खाते वापरायचे असेल, तर सदस्यतेसाठी पैसे भरावे लागतील.