आज कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही !

श्री कार्तिकस्वामी

सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; मात्र कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग येतो. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

सौ. प्राजक्ता जोशी

या वर्षी ७ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र नसल्याने स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही. या वर्षी सोमवार, ७ नोव्हेंबरला दुपारी ४.१७ वाजल्यापासून ८ नोव्हेंबरला दुपारी ४.३२ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आहे; परंतु कृत्तिका नक्षत्र नाही. कृत्तिका नक्षत्र पौर्णिमा संपल्यानंतर म्हणजे ८ नोव्हेंबरला उत्तररात्री १.३९ वाजल्यापासून आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.