मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

मुसलमान युवतीने धर्मांतरासाठी दबाव टाकल्याने हिंदु युवकाने आत्महत्या केल्याचे प्रकरण !

एआय निर्मित चित्र

सांगली – दुर्वांक शेवाळे या १९ वर्षांच्या युवकावर धर्मांतरासाठी दबाव टाकून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर येथील तरुणी सामिया बागवान आणि तिला साहाय्य करणारा सांगली येथील साहिल बागवान यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी दुर्वांकची आई भारती शेवाळे यांनी तक्रार दिली आहे. प्रारंभी दुर्वांक याने आत्महत्या केल्यावर पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप नातेवाइकांनी केला होता, तसेच गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत दुर्वांकचा मृतदेह कह्यात घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यावर सामिया आणि साहिल यांच्यावर गुन्हा नोंद झाला. (पोलिसांच्या अनास्थेमुळेच हिंदूंचे मृत्यू होत आहेत, त्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई होण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणे आवश्यक ! – संपादक) दुर्वांककडे विवाह करण्यासाठी धर्म पालटण्याचा दबाव सातत्याने सामिया टाकत होती. यातून प्रचंड मानसिक ताणातून दुर्वांकने गळफास लावून आत्महत्या केली होती.