हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सतर्कतेमुळे परतवाडा (अमरावती) येथील सहस्रो हिंदूंच्या धर्मांतराचा डाव फसला !

पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यक्रम रहित केला !

परतवाडा (जिल्हा अमरावती) – येथील ‘अंबिका लॉन’ येथे बैतुल येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मेळघाटातील आदिवासी गावांसह महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या गावांतील, काटोल (नागपूर जिल्हा) येथील, तसेच मध्यप्रदेशातील आदिवासी, दलित आणि इतर समाजाच्या सहस्रो नागरिकांना विशेष प्रलोभन देऊन आणण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना समजल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे संबंधित ख्रिस्ती संयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला. (सतर्क राहून कृती केलेल्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र असतील, तर ख्रिस्त्यांचे धर्मांतराचे डाव कधीच यशस्वी होणार नाहीत ! – संपादक) त्यामुळे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनर्‍यांचा डाव हाणून पाडला गेला.

‘अचलपूर, अंजनगाव आणि दर्यापूर या तालुक्यांत अनेक ख्रिस्ती मिशनरी फिरत असतात आणि आर्थिक नड असलेल्यांना हेरून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढतात’, असे स्थानिक हिंदूंच्या लक्षात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करणार्‍या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे, तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !
  • आदिवासी पाड्यांसह सर्वत्रच्या हिंदूंना धर्मशिक्षण दिले, तर त्यांच्यात धर्माभिमान निर्माण होईल. त्यामुळे हिंदू कुठल्याच प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच सर्वोत्तम मूलभूत उपाय आहे !