साहेबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल भागात श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक

  • महिलांसह काही जण घायाळ

  • पूर्वीही येथे झाले होते आक्रमण

दगडफेक करताना धर्मांध

साहेबगंज (झारखंड) – येथे धर्मांध मुसलमानांनी २८ ऑक्टोबर दिवशी श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. यात महिलांसह काही जण गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दगडफेक रोखण्यासाठी  पोलिसांनी लाठीमार करत स्थितीवर नियंत्रण मिळवले. येथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. येथील मुसलमानांच्या घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली. दळणवळण बंदीच्या पूर्वीही येथे मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाली होती. (जर पूर्वी येथे अशी घटना घडली होती, तर पोलिसांनी या वेळी खबरदारी घेऊन ती पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची चौकशी होऊन हलगर्जीपणा करणार्‍या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्यामुळे हिंदू असुरक्षित असतील, त्यात नवल ते काय ?
  • एक गाव मुसलमानबहुल असल्यावर जी स्थिती निर्माण होते, तिच स्थिती, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश मुसलमानबहुल झाल्यावर निर्माण होईल, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे जाणा !