टि्वटरचे मालक इलॉन मस्क यांची ‘सामग्री नियंत्रण परिषद’ सिद्ध करण्याची घोषणा

बंद खाती पुन्हा चालू करण्यासाठी टि्वटरच्या हालचाली !

सॅन फ्रान्सिस्को – प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी नुकताच टि्वटर आस्थापनावर मालकी अधिकार मिळवला आहे. टि्वटरवर मालकी अधिकार संपादन केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल या वरिष्ठ अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता त्यांनी टि्वटरविषयी ‘सामग्री नियंत्रण परिषद (कंटेंट मॉडरेशन काऊन्सिल) सिद्ध करण्याची घोषणा केली आहे.

१. टि्वटर व्यापक स्तरावर विविध दृष्टीकोनांसह ‘सामग्री नियंत्रण परिषद’ स्थापन करेल. ही परिषद टि्वटरच्या सामग्री नियंत्रणाविषयी निर्णय घेईल.

२. ‘सामग्री नियंत्रण परिषदे’च्या आढाव्यानंतर बंद खाती पुन्हा चालू करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.