हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !
ठाणे, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – डोंबिवली येथे कोकण महोत्सवात ‘हलाल मुंचाईस फूड कॉर्नर’ नावाचा कक्ष लावण्यात आल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले. हिंदुत्वनिष्ठ आणि काही संघटना यांनी कक्षाला जोरदार विरोध केला. सामाजिक माध्यमांवर याविषयीचे प्रबोधन करणारे संदेश प्रसारित होऊ लागले. परिणामी या प्रदर्शनातून ‘हलाल मुंचाईस फूड कॉर्नर’ नावाचा फलक कक्षाच्या मालकाने काढून टाकला.
हलाल विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम, डोंबिवलीत कोकण महोत्सवातून हलाल स्टॉल फलक हटवला https://t.co/FWnelEtzAI#Halal_Free_Diwali #HalalFreeDiwali #हलाल_मुक्त_दिवाली #हलाल_मुक्त_दिवाली #हलाल_मुक्त_दिवाळी @RanjitSavarkar @SavarkarSmarak @Ramesh_hjs #HindusthanPost
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 22, 2022
१. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेहरू मैदान येथे १४ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ‘कोकण महोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. येथे हा कक्ष लावल्याचे हिंदुत्वनिष्ठ श्री. अजित धामणस्कर यांना लक्षात आले.
२. श्री. धामणस्कर यांनी सामाजिक माध्यमांवर याविषयी प्रबोधन करणारे संदेश प्रसारित करून नागरिकांना जागृत केले.
३. ‘हिंदूंच्या दिवाळी सणानिमित्त लावलेल्या कोकण महोत्सवात हलाल खाद्यपदार्थांचा कक्ष कशासाठी लावला आहे ?’, असा प्रश्न आयोजकांना विचारत श्री. धामणस्कर यांच्यासह हिंदुत्वनिष्ठांनी कक्षाला विरोध केला. (स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये याविषयी जागृती करणार्या श्री. अजित धामणस्कर यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठच ही हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत ! – संपादक)
हलालच्या षड्यंत्राच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी ‘हलालसक्ती विरोधी परिषदे’त हलाल सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना केली. त्या माध्यमातून हलालला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.