
चेन्नई (तमिळनाडू) – येथे हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्ती (वय ३२ वर्षे) यांना समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शक्ती वेंगामेडू ज्योतिदार स्ट्रीट येथे रहाणारे असून या संघटनेचे ते करूर जिल्हा समन्वयक आहेत. त्यांनी हिंदूंना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्या दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली होती. हिंदूंनी दुकानातून वस्तू खरेदी करण्यापूर्वी प्रथम ‘दुकानात हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत का ?’, हे पहाण्याचे आवाहन या पत्रकातून करण्यात आले होते. यावरून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भाव राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे) आणि ५०५ (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारी विधाने) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
Tamil Nadu: Man arrested for asking people to buy only from Hindu shops for Diwali https://t.co/5EmE0mQjTw
— OpIndia.com (@OpIndia_com) October 16, 2022
संपादकीय भूमिका
|
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !