चीन अंतराळात उपग्रह उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची सिद्धता करत आहे ! – ब्रिटनची गुप्‍तचर संस्‍था

नवी देहली – चीन अंतराळात उपग्रह उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची सिद्धता करत आहे, असे ब्रिटनच्‍या गुप्‍तचर संस्‍थेने म्‍हटले आहे.

ब्रिटनची गुप्‍तचर संस्‍था जी.सी.एच्.क्‍यू.चे प्रमुख सर जेरेमी फ्‍लेमिंग म्‍हणाले की, चीन अंतराळात शक्‍ती वाढवण्‍याचे प्रयत्न करत आहे. चीन अंतराळात वर्चस्‍व राखण्‍यासाठी ‘स्‍टार वॉर्स’ (अंतराळातील युद्ध) या चित्रपटाप्रमाणे शस्‍त्रांची निर्मिती करत आहे. चीनच्‍या ‘बायडू सॅटेलाईट नेटवर्क’चा वापर कुणालाही आणि कधीही शोधण्‍यासाठी केला जाऊ शकतो. रशिया आणि चीन यांच्‍याकडे उपग्रहविरोधी शस्‍त्रे आहेत; परंतु आता चीन ‘लेझर’ प्रणालीवर काम करत आहे. त्‍याद्वारे माहितीचे दळणवळण, निगराणी आणि ‘जी.पी.एस्.’ उपग्रह हे उद़्‍ध्‍वस्‍त केले जाऊ शकते. उपग्रह नष्‍ट केल्‍यास क्षेपणास्‍त्रांना लक्ष्यभेद करता येणार नाही. चीन जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानात वर्चस्‍वासाठी धडपडत आहे. चीनला रोखण्‍यासाठी कठोर कारवाईची आवश्‍यकता आहे.