मोमीनपूर (बंगाल) येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड

कोलकाता – बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी  प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड झाली. हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण परिसरात दोन समुदायांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय सैन्यदल तैनात करण्याची मागणी केली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने मोमीनपूरच्या एकबालमध्ये अचानक हिंसाचार उसळला. या समुदायाच्या लोकांनी एकबालपूर पोलीस ठाण्याला घेराव घातला. यानंतर जमावाने रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि जवळपासची दुकाने यांची तोडफोड केली. अनेक ठिकाणी बाँब फेकल्याचे आणि दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मोमीनपूरमधील हिंसाचारानंतर भाजपचे नेते डॉ. सुकांत मजुमदार यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी ‘मिलाद-उन-नबी’ सण साजरा करणार्‍या समुदायाने हिंदूंची दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेहमीप्रमाणे कोणतीही कारवाई  न करता त्या लोकांना मोकळे सोडले आहे’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही हिंदूंना शहाणपण शिकवणारे निधर्मीवादी आता अशांना एका शब्दानेही उपदेशाचे डोस पाजणार नाहीत, हे जाणा !
  • ‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?