सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
एकदा मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘त्यांना माझा वाढदिवस आहे’, हे ठाऊक नसतांनाही प्रसाद पाठवला. हा प्रसंग आठवून माझी भावजागृती झाली आणि देवाने मला काही ओळी सुचवल्या.
परम पूज्य, तुम्ही स्थुलातूनी सर्व घडवता ।
तरी ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। १ ।।
तुम्ही मनातील सर्व विचार जाणता ।
तरी ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। २ ।।
तुम्ही साधकांचे लाड पुरवता ।
तरी ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। ३ ।।
वाईट शक्तींच्या त्रासांपासून साधकांना वाचवता ।
तरी ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। ४ ।।
मृत्यूनंतरही साधकांची साधना करून घेता ।
तरी ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। ५ ।।
साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून बाहेर काढता ।
तरी तुम्ही ‘मी केले नाही’, असे का म्हणता ।। ६ ।।
सांगा ना परम पूज्य (टीप), ‘मी देव नाही’, असे का म्हणता ।
‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’, असे पुनःपुन्हा का सांगता ।। ७ ।।
परम पूज्य, कधीतरी दाखवा ना तुमचे विराट रूप ।
कधीतरी दाखवा ना तुमचे मूळ स्वरूप ।। ८ ।।
विष्णुस्वरूप श्री गुरूंच्या चरणी ।
प्रार्थना ही सार्या विष्णुभक्तांची ।। ९ ।।
कलियुगात आम्हा पामरांसाठी अवतरलेल्या हे ईश्वरा ।
‘मीच ईश्वर आहे’, असे तुम्ही आता तरी सांगा ना ।। १० ।।
गुरुचरणार्पणमस्तु ।
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |