प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

कराड येथील साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्यकुमार कणसे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

राड – खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने कराड येथे या आदेशानुसार तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्यकुमार कणसे यांना हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत देण्यात आले. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कणसे यांनी दिले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अनिल कडणे, बाबुराव पालेकर, चिंतामण पारखे आदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?