द्वारका – गुजरातमधील द्वारका हे भगवान श्रीकृष्णाचे शहर म्हणून जगभर ओळखले जाते; पण त्याच द्वारकानगरीला अवैध मजारी (मजार म्हणजे पीर किंवा फकीर यांचे थडगे) आणि दर्गे यांचा विळखा पडला आहे. (एवढी अवैध बांधकामे होईपर्यंत सरकार काय करत होते ? अशा अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) ही अवैध बांधकामे हटवण्यासाठी गुजरात सरकाने ‘ऑपरेशन क्लीनअप’ च्या अंतर्गत ४ दिवसांत ५०हून अधिक अवैध मजारी आणि दर्गे यांवर बुलडोझर चालवला. ही अवैध बांधकामे पाडल्यामुळे १ लाख चौरस फूट सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त झाली आहे. या परिसरातील स्थानिक हिंदू लोकांनी अवैध बांधकामाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बेट द्वारका येथे १ सहस्राहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
Nearly 35 illegal structures at Beyt Dwarka island in Dev Bhoomi Dwarka district of Gujarat have been demolished over the last three days, a district official said.https://t.co/GxnYBGzjMN
— Hindustan Times (@htTweets) October 3, 2022
बेट द्वारका परिसरातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण !
या भागात सुमारे १० सहस्र लोकसंख्या आहे. येथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हिंदूंची लोकसंख्या केवळ १ सहस्र ५०० आहे. त्यामुळेच या अवैध बांधकामांविषयी बराच काळ या लोकांना आवाज उठवता आला नाही; मात्र आता प्रशासकीय कारवाईनंतर अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने परिसरातील हिंदू कुटुंबे भयभीत झाली आहेत. (अवैध बांधकामे पाडल्यानंतर खरे तर मुसलमानांनी प्रशासनाच्या कारवाईने भयभीत व्हायला हवे; मात्र येथे त्यांच्या हिंसक वृत्तीमुळे निरपराध हिंदूंनाच भयभीत व्हावे लागत आहे ! द्वारका भारतात आहे कि पाकमध्ये ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकेवळ बांधकामे पाडून न थांबता एवढी वर्षे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल दंडही आकारा ! |