मुंबईत ९ ऑक्टोबरला ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’चे आयोजन !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांचा पुढाकार

  • हिंदूंना ‘हलाल’ वस्तू विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था उभारण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता उघड करणार

मुंबई – हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे ही परिषद होणार आहे.

या परिषदेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ‘हलाल जिहादच्या माध्यमातून राष्ट्र आणि हिंदुविरोधी कृत्यांना कशा प्रकारे खतपाणी घातले जात आहे, यांविषयीची माहिती, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर हलाल प्रमाणपत्राचा होणारा घातक परिणाम, यांविषयी परिषदेत चर्चा होईल. याविषयी सविस्तर आणि तपशीलवार माहिती देणार्‍या ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.