पायाला झालेले कुरूप काढल्यानंतर तिथे जंतूसंसर्ग होऊन जखम होणे आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला जप केल्याने जखम लवकर भरून येणे

‘माझ्या पायाला झालेले कुरूप काढल्यानंतर तिथे जंतूसंसर्ग होऊन जखम झाली. त्यामुळे मला वेदना असह्य झाल्या. १५.५.२०२१ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः। श्री हनुमते नमः ।  श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप २ घंटे करायला सांगितला. मी आधुनिक वैद्यांनी दिलेल्या वेदनाशामक गोळ्यांसह हा नामजप नियमित केला.

मी एक दिवसाआड जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात जात होते. २६.५.२०२१ या दिवशी मी जखमेवरची पट्टी पालटायला गेल्यावर तेथील परिचारिका मला म्हणाली, ‘‘ताई, परवा पट्टी काढली, तेव्हा जखम ओली होती. आज ती जखम दिसतही नाही.’’ तेव्हा ‘जखम एवढ्यात कशी भरून आली ?’, याचे मलाही आश्चर्य वाटले. ‘सद्गुरूंनी दिलेल्या नामजपामुळे ओली असलेली जखम लवकर भरून येण्याचा चमत्कार झाला’, असे वाटून माझ्याकडून मनापासून देव आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्रीमती सुनीता जाधव, कोपरखैरणे, नवी मुंबई. (३०.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक