हा असे गुरुज्ञानाचा सिद्धांत, मंत्रमुग्ध जाहले ब्रह्मांड ।

‘१९.१.२०२२ या दिवशी मी झोपेत असतांना देवाने मला पुढील कविता सुचवली आणि ती माझ्याकडून लिहून घेतली. 

श्रीमती भाग्यश्री आणेकर

गुरुज्ञानाचा हा रथ ।
कृष्ण चालवतो डौलात, डौलात ।। धृ. ।।

समाजाच्या हितासाठी, ही ज्ञानगंगा अवतरली ।
जन्मोजन्मीच्या कल्याणासाठी,
ज्ञानगंगेचे हे रसपान करी ।। १ ।।

या जन्माचे गं हित, गुरुज्ञानातून बोध घे ।
करून घे रे जन्माचे सार्थक, गंगा आली रे तुझ्या दारात ।। २ ।।

मानवाच्या कल्याणासाठी ज्ञानमयी गंगा ।
गुरुकृपेचा महिमा जाणा, सांगतो हा विघ्नहर्ता ।। ३ ।।

चिंतामणी बैसला जिव्हेवर, अचूक मर्म सांगत ।
बुद्धीवाद्यांची बुद्धी झाली कुंठित ।। ४ ।।

साधकांच्या समवेत राहून, गुरुसेवा करतो अचूक ।
चिंतामणीचे हे रूप, गुरुसेवेचा लाभ दिला साधकास ।। ५ ।।

गुरुमहिमा असे हा थोर, शुद्धी व्हावी ब्रह्मांडात ।
हा असे गुरुज्ञानाचा सिद्धांत, मंत्रमुग्ध जाहले ब्रह्मांड ।। ६ ।।

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (१३.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक