उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. जयेश ओंकार कापशीकर हा या पिढीतील एक आहे !
आज, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी (२३.९.२०२२) या दिवशी कु. जयेश ओंकार कापशीकर याचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. जयेश ओंकार कापशीकर याला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. श्रद्धा केदार कापशीकर (काकू), बारामती, जिल्हा पुणे.
१ अ. जयेशची चूक नसतांनाही आई त्याला रागवल्यावर त्याने शांत आणि स्थिर रहाणे : ‘एकदा जयेश आमच्याकडे बारामतीला आला असतांना त्याच्या भ्रमणसंगणकावर (‘लॅपटॉप’वर) त्याचा ‘ऑनलाईन’ वर्ग चालू होता. त्याने भ्रमणसंगणक भारित करण्यास (चार्जिंगला) लावला होता. अकस्मात् माझ्या मुलगा कु. कार्तिक (वय १० वर्षे) याने पलंगावरून खाली उडी मारली आणि त्याचा पाय भ्रमणसंगणकाच्या ‘केबल’मध्ये अडकून भ्रमणसंगणक खाली पडला. जयेशने भ्रमणसंगणक चुकीच्या बाजूला ठेवला होता. त्यासाठी त्याची आई त्याला रागावली. खरेतर कार्तिकचीच चूक अधिक होती आणि यामुळे जयेशला ‘ऑनलाईन’ वर्गासाठी अडचण येणार होती. त्याची परीक्षाही जवळ आली होती; पण तो एका शब्दानेही आईला ‘माझी काही चूक नसतांना तू मला का रागवत आहेस ?’, असे म्हणाला नाही.
या प्रसंगानंतर माझ्या मनात विचार आला, ‘आता इथून पुढे जयेश कार्तिकशी चांगला वागेल का ? तो कार्तिकला रागवेल का ? ‘तुझ्यामुळे मला रागावून घ्यावे लागले’, असे म्हणेल का ?’; पण या सर्व प्रसंगामध्ये जयेश शांत आणि स्थिर होता. तो कार्तिकशीही पूर्वीप्रमाणेच वागत होता.’
२. श्रीमती उर्मिला अरुण कापशीकर (आजी), श्री. केदार अरुण कापशीकर (काका) आणि सौ. श्रद्धा केदार कापशीकर (काकू), बारामती, जिल्हा पुणे.
२ अ. स्वीकारण्याची वृत्ती : ‘जयेशला थंडीसाठी स्वेटर विकत घ्यायचा होता. तेव्हा त्याने आईला सांगितले, ‘‘मला शिवाजी महाराजांचे विशिष्ट चित्र असलेला स्वेटर हवा आहे.’’ राष्ट्रपुरुष आणि संत यांची चित्रे असलेले कपडे वापरू नयेत (टीप); म्हणून त्याची आई त्याला म्हणाली, ‘‘तसा स्वेटर न घेता आपण वेगळ्या पद्धतीचा स्वेटर घेऊ.’’ तेव्हा त्याने ते लगेच स्वीकारले.
(टीप – राष्ट्रपुरुष आणि देवता यांची चित्रे असलेले कपडे वापरल्यास ‘ती चित्रे खराब होणे, त्यांवर डाग पडणे किंवा कपडे धुतांना ते आपटले जाणे’ इत्यादी गोष्टींमुळे त्यांचे विडंबन होते; म्हणून राष्ट्रपुरुष आणि देवता यांची चित्रे असलेले कपडे वापरू नयेत.)
२ आ. वाचनाची आवड : त्याला वाचनाची पुष्कळ आवड आहे. तो सुटीत घरी येतांना नेहमी एक पुस्तक वाचायला घेऊन येतो. त्यामुळे त्याला गड आणि दुर्ग यांविषयी पुष्कळ माहिती आहे.
२ इ. लहान वयातच जीवनाचे ध्येय ठरवणे : त्याने सैन्यात जायचे ठरवून आयुष्याचे ध्येय निश्चित केले आहे. ‘श्रीकृष्णाच्या कृपेने त्याचे ध्येय त्याला साध्य होऊ दे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
३. कु. कार्तिक केदार कापशीकर (चुलत भाऊ, वय १० वर्षे), बारामती, जिल्हा पुणे
‘जयेशदादाला राष्ट्र्र आणि धर्म यांविषयी पुष्कळ अभिमान आहे. त्याचा हा गुण मला फार आवडतो.’
‘प.पू. गुरुदेव, आपल्या कृपेनेच हे सर्व लिहिता आले. ‘आपण आम्हा सर्व कुटुंबियांना आपल्या चरणांशी घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. जयेश याचे सर्व कुटुंबीय
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.१.२०२१)