हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी, या हेतूने १५.९.२०२४ या दिवशी सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत सर्व साधकांना ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. वैखरीतून नामजप करत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. भाग्यश्री योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज.
१ अ. आकाशात गुलाबी आणि निळी छटा दिसणे : ‘नामजप चालू केल्यावर थोड्याच वेळात आकाशात गुलाबी आणि निळी छटा पसरली अन् इंद्रधनुष्याप्रमाणे रंग पसरले.
१ आ. सूर्यास्ताच्या वेळची केशरी प्रभा पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची प्रभा पसरली आहे’, असे मला जाणवले.
१ इ. श्रीराम अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे : नामजप करतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती आणि धनुष्यबाण घेतलेल्या श्रीरामाचे दर्शन होऊन श्रीराम अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते.
१ ई. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहातांना ‘ते स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवणे : पू. आबांच्या (सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआबा (वय ८६ वर्षे) यांच्या) खोलीत गुरुदेवांचे एक छायाचित्र आहे. त्या छायाचित्राकडे पहातांना ‘गुरुदेव छान स्मितहास्य करत आहेत’, असे मला दिसत होते. लवकरच हिंदु राष्ट्र पहायला मिळणार असून ‘आपण त्याचे साक्षीदार आहोत’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्या वेळी मला पुष्कळ आनंद होत होता.
१ उ. ‘श्री गणपति हिंदु राष्ट्र येण्याविषयी आश्वस्त करत आहे’, असे जाणवणे : नामजप चालू असतांना मिरजेत गणपति विसर्जनही चालू होते. तेव्हा ‘मी माझ्या समवेत वाईट शक्तींचा सर्व त्रास घेऊन चाललो आहे आणि हिंदु राष्ट्र येत आहे’, असे गणपति सांगत आहे’, असे मला जाणवले.
१ ऊ. आकाशात दिसणारी गुलाबी आणि निळी छटा म्हणजे ‘देवाने दिलेली प्रचीती आहे’, असे वाटणे : आकाशात दिसत असलेली गुलाबी आणि निळी छटा नामजपानंतरही बराच वेळ दिसत होती. ‘ही देवाने दिलेली प्रचीती आहे आणि पूर्ण ब्रह्मांडात नामजप अन् चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला या अनुभूती आल्या. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज.
२ अ. नामजप चालू असतांना आणि संपल्यावर आकाशात विविध रंगी छटा पहायला मिळणे : ‘नामजप चालू असतांना आश्रमातील ध्यानमंदिराच्या बाहेरील बाजूस आकाशामध्ये विविध छटा पहायला मिळाल्या. नामजप संपल्यानंतर आणखी एक वेगळ्या प्रकारची छटा पहायला मिळाली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १६.९.२०२४)
|