भारतातील बनावट नोटांचा सर्वांत मोठा पुरवठादार लाल महंमद याची काठमांडूमध्ये हत्या !

काठमांडू (नेपाळ) – पाकिस्तानी गुप्तर संस्था आय.एस्.आय.चा हस्तक म्हणून काम करणाला लाल महंमद उपाख्य महंमद दर्जी याला येथे अज्ञातांनी गोळ्या छाडून ठार केल्याची घटना १९ सप्टेंबरच्या रात्री घडली. लाल महंमद भारतात बनावट नोटांचा सर्वांत मोठा पुरवठादार होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. लाल महंमद पाकिस्तान, बांगलादेश येथून बनावट भारतीय चलन आधी नेपाळमध्ये आणायचा आणि नंतर भारतात पुरवठा करायचा. त्याचे संबंध कुख्यात गुंड आणि जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या टोळीशी होते. त्याने आय.एस्.आय.च्या इतर हस्तांनाही आश्रय दिला होता.

संपादकीय भूमिका

लाल महंमद भारतात बनावट नोटा पुरवतो, हे ठाऊक असूनही त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नव्हती, याचे उत्तर कोण देणार ? असे किती लाल महंमद देशात आणि भारताच्या  शेजारी देशांत रहात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, यांचेही उत्तर कोण देणार ?