‘दळणवळण बंदीच्या काळात मला आश्रमात जायला मिळेल का ?’, असे वाटत होते. मला आश्रमातील महाप्रसादाची पुष्कळ आठवण येत होती.
१. एका मठात जेवत असतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादाची आठवण होणे आणि प्रार्थना करून महाप्रसाद ग्रहण करणे : एकदा मी एका मठात गेलो होतो. तेथे जेवायला बसल्यावर तेथील प्रसाद पाहून मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादाची आठवण झाली. तेव्हा ‘हे भगवंता, मी रामनाथी आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करत आहे’, अशी मनोमन प्रार्थना करून महाप्रसाद ग्रहण केला.
२. प्रत्येक घास घेतांना रामनाथी आश्रमातील पदार्थांप्रमाणे चैतन्य जाणवणे आणि भाव जागृत होऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : तेव्हा प्रत्येक घास घेतांना मला रामनाथी आश्रमातील पदार्थांप्रमाणे चैतन्य जाणवत होते. ‘मी रामनाथी आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता. मी घरी असूनही मला रामनाथी आश्रमातील प्रसाद ग्रहण करायला मिळत आहे, याबद्दल माझी गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता व्यक्त होत होती.
३. साधक कुठल्याही परिस्थितीत असले, तरीही परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या इच्छा पूर्ण करतात, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– गुरुचरणांचा सेवक,
अधिवक्ता अभय अनिल कुलकर्णी, पंढरपूर (डिसेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |