संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय.च्या नेत्याला अटक !

आतापर्यंत २७ जण गजाआड !

रा.स्व. संघाचे नेते श्रीनिवासन्

पलक्कड (केरळ) – जिल्ह्यात १६ एप्रिल २०२२ या दिवशी रा.स्व. संघाचे नेते श्रीनिवासन् यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी आतंकवादी संघटनेचा पलक्कड जिल्ह्याचा सचिव अबू बकर सिद्दीकी याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी एकूण अटक करण्यात आलेल्यांची संख्या २७ झाली आहे. यांमध्ये पी.एफ्.आय.चे १८, तर त्याचीच राजकीय आघाडी असलेल्या ‘स्टुडंट्स डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया’च्या ९ जणांचा समावेश आहे. सिद्दीकी याला झालेल्या अटकेवर पी.एफ्.आय.कडून सामाजिक माध्यमांवरून थयथयाट करण्यात येत आहे.

नेते श्रीनिवासन् हे संघाचे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण प्रमुख होते. ते एका दुकानाजवळ उभे असतांना ३ दुचाकींवरून आलेल्या धर्मांध मुसलमानांनी तलवारीचे वार करत त्यांची हत्या केली होती. त्यांना रुग्णालयात भर्ती केल्यावर ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

जनहो, जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी लादणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे जाणा !