बंगालमधील शाळेत बाँबस्फोट ! : जीवितहानी नाही

उत्तर २४ परगणा (बंगाल) – येथील टीटागडमधील एका शाळेच्या वर्गामध्ये बाँबस्फोट झाला. यात वर्गाच्या छताचा काही भाग कोसळला. यामुळे येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शाळेत १ सहस्र ३०० विद्यार्थी आणि शिक्षक असतात.

शाळेतील शिक्षक खालिद तैयब यांनी सांगितले की, स्फोट पुष्कळ मोठा होता. आम्हाला वाटले कुणीतरी बाहेर स्फोट केला आहे. नंतर पाहिले, तर वर्गातून धूर येतांना दिसला. जर मधल्या सुट्टीत स्फोट झाला असता, तर मोठी हानी होऊ शकली असती. येथे बाँब ठेवण्यात आला कि कुणी फेकला, हे स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !