हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

२ वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदु साधूंना केलेल्या पुष्कळ मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम भरत नाही, तोच पुन्हा सांगली येथील लवंगा गावात ४ हिंदु साधूंना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित झाला आहे. ही घटना संताप आणि चीड आणणारी आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तात्काळ नोंद घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
सांगली के लवंगा गांव में 4 हिन्दू साधुओं को स्थानीय लोगों द्वारा पीटे जाने का वीडियो सामाजिक माध्यमों पर वाइरल हुआ है। यह घटना संतापजनक है। इस संदर्भ में मा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis तुरंत हस्तक्षेप करे एवं दोषियों पर कठोर कार्यवाही करे, ऐसी मांग @HinduJagrutiOrg ने की है। pic.twitter.com/JkEdTVyGVK
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 14, 2022
साधूसंतांची भूमी म्हणावणार्या महाराष्ट्रात साधूंना सतत होणार्या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा लज्जेने खाली गेली आहे. एखादा मुसलमान मौलवी (इस्लामी अभ्यासक) वा ख्रिस्ती पाद्री यांच्याविषयी असे कधी घडल्याचे ऐकायला येत नाही. निरपराध हिंदु साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हिंदु साधूंविषयी असे वारंवार घडत असेल, तर शासनाने यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असेही समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !