रशियाला कंगाल करणे हा अमेरिकेचा डाव ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

जोपर्यंत रशियाचे संपूर्ण आर्थिक खच्चीकरण होत नाही, तोपर्यंत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालूच राहील. आता हे युद्ध रशिया आणि युक्रेन यांच्यातील राहिले नाही. हे दोघे जरी या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी असले, तरी रशिया युक्रेनसमवेत अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देश यांच्या आर्थिक शक्तीसमवेत लढत आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला २०० कोटींहून अधिक आर्थिक आणि शस्त्रास्त्रे यांचे साहाय्य केले आहे. त्यामुळे हा अमेरिकेचा अत्यंत मोठा आणि सर्वसमावेशक डाव दिसून येतो. जोपर्यंत रशिया पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबघाईला येत नाही, तोपर्यंत हे युद्ध चालू ठेवायचे, असा हा डाव आहे.