सांगली येथील श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज उपस्थित रहाणार ! – मनोहर सारडा

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

सांगली – ४ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत सांगली येथे श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा होणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्या येथील श्रीराममंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज येणार आहेत, अशी माहिती याचे मुख्य आयोजक श्री. मनोहर सारडा यांनी दिली.

श्री. मनोहर सारडा पुढे म्हणाले, ‘‘प्रतिदिन दुपारी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची श्रीरामकथा, सायंकाळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ, विद्वान आणि अधिकारी यांचे सांप्रदायिक कीर्तन, तसेच समाजोपयोगी उपक्रम होणार आहेत. या सोहळ्यात ७ जानेवारी २०२३ या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० या वेळेत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज उपस्थित राहून आशीर्वचन देणार आहेत.’’