मुसलमान तरुणांनी हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या घटना !

अटक करण्यात आलेला आरोपी चांद बाबू

बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादची प्रकरणे समोर आली आहेत. उत्तरप्रदेशातील बरेली येथे चांद बाबू याने डॉ. विशाल असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रमेच्या जाळ्यात ओढले आणि तिचे दीड मास लैंगिक शोषण करून तिचा अश्‍लील व्हिडिओ बनवला. तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर चांद बाबू याला अटक करण्यात आली. तो विवाहित असून त्याला २ मुलेही आहेत.

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये अस्लम याने संजय असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्या दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला. १ वर्षे ते समवेत राहिल्यानंतर अस्लम हिंदु तरुणीला त्याच्या गावी घेऊन गेला. त्या वेळी तरुणीला तो मुसलमान असल्याचे समजले. त्यानंतर त्याने तिला मुसलमान होण्यासाठी दबाव निर्माण केला. तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यावर अस्लम याला अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

या दोन्ही राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे; मात्र त्याचा कोणताही धाक मुसलमान तरुणांना नाही, हेच या घटनांतून निदर्शनास येते. त्यामुळे कायद्यामधील शिक्षेची तरतूद अधिक कडक करण्याच्या आवश्यकतेसह हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !