(म्हणे) ‘टी. राजा सिंह जेथे भेटतील तेथे त्यांना मारहाण करा !’

काँग्रेसचे आमदार फिरोज खान यांची मुसलमानांना चिथावणी !

डावीकडून काँग्रेसचे आमदार फिरोज खान आणि आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – टी. राजा सिंह लांगूलचालनाचे राजकारण करू इच्छित आहेत. त्यांना कारागृहात टाकले पाहिजे. टी. राजा सिंह यांच्या त्यांच्या विधानावरून क्षमा मागितली पाहिजे आणि म्हटले पाहिजे, ‘महंमद पैगंबर मुसलमानांचे हिरो आहेत.’ जर त्यांनी असे केले नाही, तर मी प्रत्येक मुसलमानाला सांगू इच्छितो की, राजा सिंह भाग्यनगरमध्ये कुठेही भेटले, तर त्यांना मारहाण करावी. आम्ही एकदा नाही, तर सतत कायदा हातात घेऊ शकतो, अशी चिथावणी काँग्रेसचे आमदार फिरोज खान यांनी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस राशिद खान यांनी धमकी दिली होती की, जर राजा सिंह यांना अटक झाली नाही, तर त्यांचे घर जाळण्यात येईल.

  • अशा प्रकारची थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी चिथावणी एखाद्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली असती, तर त्याला लगेच कारागृहात डांबले असते !
  • ‘देशातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी कोल्हेकुई करणारे आता कुठे आहेत ?