सौ. नेहा प्रभु यांना त्यांच्याकडील श्रीकृष्णाच्या चित्राच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुवार, १८ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे. त्या निमित्ताने…

‘वर्ष २०१६ पासून माझ्याकडे भगवान श्रीकृष्णाची मोठी प्रतिमा आहे. त्या चित्राच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती आणि त्या चित्रात  झालेले पालट पुढे दिले आहेत.

सौ. नेहा प्रभु

१. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून आत्मनिवेदन केल्यावर अडचणी सुटणे आणि मन हलके होणे

मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून आत्मनिवेदन करते. ‘आत्मनिवेदन केल्यावर माझ्या सर्व अडचणी सुटतात आणि मन हलके होते’, अशी मला अनुभूती येते.

२. श्रीकृष्णाच्या चित्रात झालेला पालट

श्रीकृष्णाचा रंग गडद निळा आणि त्याच्या अलंकारांचा रंग गडद सोनेरी झाला आहे. (श्रीकृष्णाचे हे रंगीत चित्र पहाण्यासाठी संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे.)

ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे. याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक