काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण : एक जण ठार, दुसरा घायाळ

शोपिया (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. १६ ऑगस्टला येथील छोटेपोरा भागात सफरचंदाच्या बागेत काम करणार्‍या दोघा काश्मिरी हिंदूंवर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. त्यात एक जण ठार, तर दुसरा घायाळ झाला. हे दोघही सख्खे भाऊ आहेत. मृत हिंदूचे नाव सुनील कुमार आहे. या आक्रमणानंतर सुरक्षादलांनी या भागात शोधमोहीम चालू केली आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर्षी अशा एकूण १६ घटना घडल्या आहेत. याद्वारे ते काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून प्रतिदिन जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपलेला नाही आणि जोपर्यंत त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तसेच जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !