
मुंबई – राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केला आहे. या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नगरविकासमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय पालटू शकतात ?’, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारने ९ प्रभाग वाढवून मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना केली होती, तसेच आरक्षण सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर नवनियुक्त सरकारकडून निवडणूक घोषित होणे अपेक्षित होते; मात्र या सरकारने वर्ष २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे मत आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !