लागो ध्यास (कृष्णा) तुझा रक्षाबंधनी !

श्री. धैवत वाघमारे

भजावे हरिनामास ।
तेव्हा रक्षील हृषिकेशि ।।
तोच असे रक्षण्या समर्थ सर्वांस ।
घालावे रक्षाबंधन त्यास ।। १ ।।

प्रीती बंधन केशवा ।
मागुता कैचि चिंता ।।
करतो प्रार्थना तया ।
वहावा भार साधकांचा ।। २ ।।

आपत्काली तूच रे माधवा ।
आहेस हृदयि आमुच्या ।।
गोपींसम करूनी घ्यावी भक्ती ।
लागो ध्यास तुझा रक्षाबंधनी ।। ३ ।।

– श्री. धैवत वाघमारे (२४.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक