काँग्रेसने मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – निवृत्त कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

‘आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नष्ट करण्याची आवश्यकता आहे. देशात काँग्रेसची सत्ता असतांना वर्ष २००४ ते २००८ या कालावधीत देहली, वाराणसी, अयोध्या, जयपूर, भाग्यनगर, मुंबई, पुणे, मालेगाव आदी विविध ठिकाणी पाकिस्तानातील ‘आय.एस्.आय.’ने भारतात बसलेल्या राजकीय नेत्यांच्या साहाय्याने बाँबस्फोट घडवून आणले. मुंबई येथील २६.११.२००८ चे आतंकवादी आक्रमण हा त्याचा कळसबिंदू होता, जेणेकरून हे सांगता यावे की, मुंबई येथील २६/११ चे आक्रमण यासह मालेगाव, समझोता एक्सप्रेस येथील बाँबस्फोट हा ‘हिंदु आतंकवाद’ होता. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेले आतंकवादी आक्रमण हे पूर्वनियोजित होते, हे आता कुठे लोक बोलायला लागले आहेत. काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.’