दौंड (पुणे) येथे ७०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

दौंड (जिल्हा पुणे) – मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून कत्तलीसाठी आणलेल्या ७ गायींची गोरक्षक आणि पोलीस यांच्या तत्परतेमुळे सुटका झाली आहे. कारवाईत किरण कुंभार या वाहनचालकाला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य ३ साथीदार पळून गेले आहेत. या प्रकरणी इद्रिस कुरेशी, बबलू कुरेशी, मुश्रीफ कुरेशी आणि किरण कुंभार या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इद्रिस कुरेशी याच्यावर गोहत्या आणि गोमांस वाहतूक प्रकरणी यापूर्वी गुन्हे नोंद आहेत. (तत्परतेने कठोर शिक्षा नसल्याने आरोपींना कायद्याचा धाक नाही, हे दर्शवणारी वारंवार घडणारी घटना ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?