उत्तराखंडमधील जिम कार्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी !

(मजार म्हणजे मुसलमानांचे थडगे)

डेहराडून (उत्तराखंड) – येथील जिम कार्बेट अभयारण्यात मुसलमानांनी अवैधमणे अनेक मजारी बांधल्याचे समोर आले आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

१. या वृत्तसंकेतस्थळाच्या वार्ताहराने या अभयारण्याचा दौरा केला असता त्याला येथे ही अवैध मजारे आढळून आली. अनेक मजारी तर प्रतिबंधित क्षेत्रात, म्हणजे जेथे हिंस्र प्राण्यांपासून अधिक धोका असल्याने तेथे पर्यटकांना वाहनातून खाली उतरण्यास बंदी आहे, अशा ठिकाणी बांधल्याचे आढळले. या मजारींविषयी अभयारण्यातील ‘गाईड’ (अभयारण्य दाखवणारा) यांनाही पुरेशी माहिती नसल्याचेही या वेळी लक्षात आले. या मजारींच्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती दिसून आली नाही. जर येथे पर्यटकांना वाहनातून खाली उतरण्यावर बंदी आहे, तर या मजारी येथे कुणी आणि कशा बांधल्या ? त्यांनी बांधकामाचे सर्व साहित्य येथे कसे आणले ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

२. अभारण्याच्या आधी येथील रामनगरातील जंगलामध्ये एका मार्गाच्या लगत एक मोठी मजार दिसून आली. येथे एकही व्यक्ती नव्हती. यावरील एका भित्तीपत्रकावर ‘भूरे शाह शेर अली जुल्फकार दादमियाँ का उर्स’, असे लिहिण्यात आले होते.

३. ‘एकूणच या भागात वन विभागाच्या चौक्या असतांना मजार कधी आणि कुणी बांधल्या ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. येथील काही भाग तर केवळ वाघांसाठी असल्याचे म्हटले जात आहे, तेथेही मजार आढळून आली.

४. येथील रमेश नावाच्या ‘गाईड’ने सांगितले की, येथे पर्यटकांना अभयारण्य दाखवणारे बहुतेक वाहन मुसलमानांचे आहेत. नैनिताल जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या १२.६५ टक्के आहे.

संपादकीय भूमिका 

अशा मजारी बांधेपर्यंत प्रशासन आणि वनाधिकारी काय करत होते ? आणि आतातरी त्यावर कारवाई होणार का ? असे प्रश्‍न उपस्थित होतात ! राज्यातील भाजप सरकारने याची चौकशी करावी, असे हिंदूंना वाटते !