रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. ‘माझ्या मनातील अनेक संदेह दूर कसे झाले ?’, हे मला कळलेच नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे दैवी व्यक्तीमत्त्व आहे’, हे मी अनुभवले.’ – श्री. प्रकाश आत्माराम देशमुख (कार्यकर्ता, स्वा. सावरकर युवा विचार मंच), पुणे (१५.६.२०२२)

२. ‘आश्रमातील स्वच्छता, नियोजन, वेळेचे पालन’, हे सर्व पाहून माझे मन प्रसन्न झाले. या आश्रमातून बाहेर पडावेसे वाटत नाही.’ – श्री. ज्ञानेश्वर उत्तम दांडेकर (तालुका अध्यक्ष, धर्मयोद्धा संघ), संभाजीनगर (१६.६.२०२२)

३. ‘अध्यात्म हे सगळ्या जिवांसाठी आवश्यक असते; पण सध्या जग विज्ञानमय झाल्यामुळे अध्यात्माचे महत्त्व विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध करावे लागते. त्या दृष्टीने आपला प्रयोग अतिशय चांगला आहे.’ – श्री. अभय केसरकर, बोरी, गोवा. (१६.६.२०२२)