१. साधनेला आरंभ केल्यामुळे साधिकेच्या यजमानांमध्ये झालेला पालट
‘पूर्वी माझ्या यजमानांचा स्वभाव रागीट होता. त्यामुळे आमच्यात भांडणे होत असत. तेव्हा मला ‘यजमानांना समजवायला देव येईल का ?’, असे वाटायचे. त्यांनी साधनेला आरंभ केल्यापासून त्यांचा त्रास न्यून झाला. त्यामुळे आमच्यात होणारी भांडणे थांबली.
२. शेतीची कामे असतांनाही यजमानांनी कोल्हापूर येथे सेवेसाठी पाठवणे
एकदा आमच्या शेतात ज्वारीची काढणी आणि मळणी करायची होती. त्याच वेळी यजमानांनी मला कोल्हापूर येथे १ मास सेवेसाठी पाठवले. तेव्हा ‘यजमानांची परात्पर गुरुमाऊली आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्यावर श्रद्धा अन् पुष्कळ भावभक्ती आहे’, असे मला जाणवले. त्यांनी एकट्यानेच शेतातील ज्वारीची काढणी आणि मळणी केली. हे सर्व गुरुदेवांनीच त्यांच्याकडून करवून घेतले.
३. अनुभूती
३ अ. नामजपादी उपाय केल्यानंतर आध्यात्मिक त्रास उणावणे : वर्ष २०१७ मध्ये गुरुपौर्णिमेपासून मी थोडी-थोडी साधना करू लागले. साधना करत असतांना मला त्रास होत होते. तेव्हा मी नामजपादी उपाय केल्यावर मला होणारा त्रास उणावत असे.
३ आ. हाताच्या मनगटावर आलेली मांसाची गाठ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहिल्यावर दोन दिवसांत विरघळणे : एकदा माझ्या हाताच्या मनगटावर मांसाची गाठ झाली होती. उपचार केल्यावर ती न्यून झाली; पण पुन्हा नवीन गाठ झाली. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘ही गाठ कर्करोगाची असू शकते.’’ ऑगस्ट २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ बघितल्यावर ही गाठ दोनच दिवसांत पूर्णपणे विरघळ्याचे लक्षात आले. एका संतांना मी हे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ती गाठ अनिष्ट शक्तीच्या त्रासामुळे होती.’’
‘हे गुरुदेवा, मला, माझ्या यजमानांना आणि आमच्या दोन्ही मुलांना तुमच्या चरणांची सेवा करता येऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुवर्णा माळी, सांगली (१२.६.२०२२)
|