साधकाच्या बहिणीला २५ वर्षांहून अधिक काळ होत असलेला ‘एक्झिमा’चा त्रास तिने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर एका मासातच दूर होणे

श्री. साईदीपक गोपीनाथ

१. बहिणीने आरंभी नामजप न करणे, तिला साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप आणि भावप्रयोग करायला सांगितल्यावर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे : ‘मी पूर्वी काही वेळा माझ्या बहिणीला (दीपा गोपीनाथ हिला) दत्तात्रेयाचा नामजप करण्याविषयी सांगितले होते; मात्र ती तो नामजप कधी करू शकत नव्हती. नंतर मला वाटले, ‘तिला तो नामजप साधनेच्या दृष्टीकोनातून सांगूया.’ ‘बहिणीला नामजप सांगणे’, ही माझी सेवाच आहे’, या भावाने मी तिला नामजप करायला सांगितला. तिला देवाची अनुभूती घेता येण्यासाठी मी तिला लहान भावप्रयोग करायला सांगितले. त्यानंतर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. ती तिच्याकडून होणार्‍या चुकांसाठी देवाची क्षमा मागू लागली.

२. तिला २५ वर्षांहून अधिक काळ होत असलेला ‘एक्झिमा’चा त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने तिने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केल्यानंतर एका मासातच दूर झाला. ती आता नियमितपणे नामजप करते. तिला आतून शांतीची अनुभूती येते.

मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. साईदीपक गोपीनाथ, थिरूवनंतपूरम्, केरळ. (१८.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक