सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी साधकाच्या मुलाला बिस्किटे असलेला खोका भेट देणे आणि त्यांनी दिलेल्या बिस्किटांच्या रिकाम्या खोक्यातून चैतन्य मिळत असल्याचे साधकाला अन् त्याच्या कुटुंबियांना जाणवणे

पू. रमानंद गौडा

‘आम्ही फेब्रुवारी २०२० या मासात मैसुरू येथे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी माझ्या मुलाला (कु. आयुषला (आताचे वय ८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५४ टक्के) बिस्किटे असलेला एक खोका भेट दिला. आयुष झोपतांना पुष्कळ मास त्याच्या उशीजवळ पू. रमानंदअण्णांनी दिलेला बिस्किटांचा रिकामा खोका ठेवायचा. तेव्हा त्याचा ‘पू. रमानंदअण्णा समवेत आहेत आणि तो झोपेत असतांना पू. रमानंदअण्णा त्याचे रक्षण करत आहेत’, असा भाव असायचा.

श्री. साईदीपक गोपीनाथ

१९.११.२०२० या दिवशी मी त्या खोक्याला स्पर्श केला. तेव्हा ‘त्यातून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. माझी पत्नी (सौ. अंजना) आणि आयुष या दोघांना तो खोका पाहून ‘त्यांनाही त्यातून चैतन्य मिळत आहे’, असे जाणवले.’

– श्री. साईदीपक गोपीनाथ, थिरूवनंतपूरम्, केरळ. (१९.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक