सातारा रस्ता, पुणे येथील सौ. रश्मी बापट या अनेक वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आहेत. त्या ऑनलाईन सत्संग, तसेच अन्य प्रवचने यांना नियमित उपस्थित असतात. सत्संगात साधनेविषयी मिळालेले मागदर्शन ऐकून त्या लगेच कृती करण्यास प्रारंभ करतात. सौ. बापट यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
नामस्मरण नामस्मरण ।
करूया आपण नामस्मरण ।। धृ.।।
कुलदेवीचे नाम स्मरूया ।
अखंड तिचा जप करूया ।।
कार्यारंभी बांधू तोरण ।
करूया आपण नामस्मरण ।। १ ।।
सत्संगाला नित्य जाऊया ।
सत्सेवेला बाहेर पडूया ।।
तन-मन-धनाचा त्याग होईल ।
नामस्मरण आतून चालू होईल ।। २ ।।
वैखरीतले नाम आपुले ।
मध्येमध्ये होऊ लागले ।।
पश्यंतीचा प्रयत्न करूया ।
परावाणीची वाट चालूया ।। ३ ।।
नामस्मरण नामस्मरण ।
कुलदेवीचे धरूया चरण ।।
नामस्मरण नामस्मरण ।
गुर्वाज्ञेचे करूया पालन ।। ४ ।।
नामस्मरण नामस्मरण ।
करूया आपण अहं निर्मूलन ।।
नामस्मरण नामस्मरण ।
करूया आपण भावार्चन ।। ५ ।।
– सौ. रश्मी बापट, पुणे (७.७.२०२१)