संजय राऊत यांना अटक आणि राज्यपालांचे वक्तव्य यांच्या निषेधार्थ सांगली येथे आंदोलन !

सांगली, १ ऑगस्ट (वार्ता.) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेली अटक ही सूडबुद्धीने केलेली आहे, तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, सांगली शहरप्रमुख मयूर घोडके, महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार, प्रसाद रिसवडे, रूपेश मोकाशी, अनिल शेटे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.