सात जणांची हत्या करणार्‍याला जपानकडून फाशी

टोकियो – जपानने ३९ वर्षीय तोमोहिरो काटो या मारेकरर्‍याला २६ जुलै या दिवशी फाशी दिली. त्याने वर्ष २००८ मध्ये मध्य टोकियोमधील अकिहाबारा येथे ट्रकद्वारे आक्रमण करून पादचार्‍यांना चिरडले होते. यामध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले होते. यानंतर त्याने चाकूद्वारे लोकांवर आक्रमण केले. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८ जण घायाळ झाले होते.