राष्ट्रीय गीत आणि राष्ट्र यांचा सन्मान न करणार्‍यांची नागरिकता रहित करण्याचा कायदा करा ! – अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा, महासचिव, भारतीय जनक्रांती दल

अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा

‘वन्दे मातरम्’ हे असे गीत आहे की, ज्यामुळे आपल्या देशाप्रती सन्मानाची भावना निर्माण होते. ज्यांना देशाप्रती प्रेम नाही, तेच याला विरोध करू शकतात. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्र यांचा सन्मान जे करत नाहीत, त्यांची नागरिकता त्वरित रहित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा या देशात लागू केला पाहिजे, तसेच ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे आमदार, खासदार किंवा त्यांचे जे काही राजकीय पद असेल, ते सुद्धा काढून घेतले पाहिजे.