पुणे शहरातील खड्डे तातडीने बुजवण्याच्या संदर्भात उपाययोजना करावी !

वाहतूक पोलिसांचे महापालिकेस पत्र !

पुणे शहरातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दूरवस्था

पुणे – खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याने हे खड्डे तातडीने बुजवले जावेत, असे पत्र वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे.

मागील आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ठेकेदारांनी तात्पुरत्या स्वरूपात बुजवलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर आल्याने रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पाणी साठण्याच्या ठिकाणांची सूचीही महापालिका प्रशासनास दिली आहे.

संपादकीय भूमिका

असे पत्र वाहतूक पोलिसांना पुणे महापालिकेला का द्यावे लागते ? महापालिका स्वतःहून खड्डे बुजवण्याचे काम हाती का घेत नाही ?