अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादीम) गौहर चिश्ती याने रचला होता अजमेर आणि उदयपूर येथे दंगली घडवण्याचा कट !

दर्ग्याच्या अन्य सेवेकर्‍यांना कटाची होती माहिती !

(दर्गा म्हणजे मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण)

अटक करण्यात आलेला मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा खादिम (सेवेकरी) गौहर चिश्ती

उदयपूर (राजस्थान) – अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा खादिम (सेवेकरी)  गौहर चिश्ती याला नुकतीच अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर गौहर याने हिंदूंच्या संदर्भात चिथावणीखोर विधाने केल्याचे व्हिडिओ प्रसारित झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या महितीतून अजमेर आणि उदयपूर येथे हिंदूंवर आक्रमण करून दंगल भडकावण्याचा त्याचा कट होता, असे समोर आले आहे. याची माहिती अन्य सेवेकर्‍यांनी होती; मात्र त्यांनी ती पोलिसांना दिली नाही, असेही उघड झाले आहे. (अशांवरही कारवाई केली पाहिजे. त्यामुळे अशी माहिती असूनही पोलिसांना न कळवणार्‍यांवरही धाक निर्माण होईल आणि पुढे असे कुठे घडणार असेल, तर त्याविषयी ते माहिती देतील ! – संपादक)

गौहर चिश्ती याने १६ जून २०२२ या दिवशी खादिमांसमवेत मोहल्ला बैठक घेतली होती. या वेळी त्याने दंगल घडवण्यासाठी चिथावणी दिली होती. तसेच त्याने एक व्हॉट्सअ‍ॅप गट बनवला होता. त्याचा कट काही खादिमांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुसर्‍या दिवशी असणार्‍या मोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे टाळले होते. या मोर्च्यानंतर गौहर चिश्ती उदयपूर येथे गेला होता. २८ जून या दिवशी महंमद रियाज आणि महंमद गौस यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. हे दोघे गौहर याच्या संपर्कात होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्‍यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !