अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. महाप्रसादापूर्वी प्रार्थना करतांना ‘या विश्वात केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधिका दोघेच असून दोघांमध्ये सुगंधाची देवाण-घेवाण होत आहे’, असे साधिकेला जाणवणे : ‘एक दिवस मी रामनाथी आश्रमात दुपारचा महाप्रसाद घेत होते. महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी मी प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटले. तेव्हा ‘या विश्वात मी आणि परात्पर गुरु डॉक्टर दोघेच आहोत आणि आमच्या दोघांमध्ये सुगंधाची (सुगंधी हवेची) देवाण-घेवाण होत आहे’, असे दृश्य मला काही क्षण दिसले. त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना किंवा कृतज्ञता काहीही व्यक्त होत नव्हती. मला शब्दातीत वातावरण अनुभवायला मिळत होते. ‘या सुगंधाच्या अनुभूतीतून बाहेर पडायला नको’, असे मला वाटत होते.
२. बाहेरच्या संतांच्या संदर्भात त्यांच्या भक्तांना अशा अनुभूती फार क्वचित् येणे : मी ही अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सनातनच्या साधकांना सनातनच्या संतांच्या संदर्भात जशा अनुभूती येतात, तशा बाहेरच्या संतांच्या संदर्भात त्यांच्या भक्तांना फार क्वचित् येतात.’’
मी ही अनुभूती गुरुचरणी अर्पण करते.’
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |