आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथे बजरंग दल ठाणे विभाग संयोजकांवर सशस्त्र आक्रमण झाल्याचे प्रकरण

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यात तिवारी हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पडताळून आक्रमणकर्त्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेकडून हे आक्रमण करण्यात आले असून ही संघटना बंदी घातलेल्या ‘सिमी’ या संघटनेचे पालटलेले रूप आहे. भारतामध्ये इस्लामी आतंकवादी संघटनांद्वारे घडवून आणलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या शृंखलेचा हे आक्रमण म्हणजे एक भाग आहे. त्यामुळे आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.